पी. लंकेश यांच्या ‘संक्रांती’ या नाटकातील उषा कन्नड साहित्यामधील एक अद्वितीय स्त्री व्यक्तिरेखा आहे
‘संक्रांती’ हे नाटक स्वातंत्र्योत्तर भारतीय राजकारणाचा मोठ्या प्रमाणावर झालेला भ्रमनिरास ध्वनित करतं. १९७०च्या राज्य व राजकारणाची प्रागतिक पुनर्रचना करण्याचा युक्तिवाद करणाऱ्या प्रखर सामाजिक चळवळींच्या वादळी पार्श्वभूमीवर लिहिलेलं ‘संक्रांती’ हे नाटक क्रांतीच्या झिजणाऱ्या प्रभावाखाली, तसेच सुधारणा व निरंतर बदलाखाली अडकलेल्या व्यक्तींच्या ‘पेचप्रसंगांची’ कसून तपासणी करतं.......